¡Sorpréndeme!

Latest Sport Update | तुम्हाला फुटबॉलची मॅच बघायची आहे | मग मुलींना पुरुष व्हावे लागेल | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

ईराणमधील महिलांवर अनेक बंधनं आहेत. या बंधनांना विविध पद्धतीने येथील महिला विरोध करत आहेत. ईराणमध्ये महिलांना फुटबॉलचे सामने मैदानात जाऊन पाहण्यासही बंदी आहे. याचा अर्थ असा नाही की येथे महिला फुटबॉलचे सामने पाहात नाहीत. बंदी असूनही अनेक महिला विविध क्लुप्त्या वापरून फुटबॉलचे सामने पाहायला मैदानात जातात.काही महिला पुरुषांचे कपडे घालून मैदानात जाण्याचा प्रयत्न करतात. जहरा नावाच्या एका महिलेचा पुरुषांच्या वेशातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जहराने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून मैदानात घुसण्या साठी पुरुषांप्रमाणे दाढी-मिशी लावली होती. तसेच पुरुष वाटण्यासाठी तसा मेक-अपही तिने केला होता.जहराच्या फोटोनंतर ईराणमध्ये पुन्हा एकदा महिलांना फुटबॉलचे सामने मैदानात पाहण्यास सूट मिळावी अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews